राजे रामराव व पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये सामंजस्य करार, दोन्ही महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचा पुढाकार


जत/ प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. येथील राजे रामराव महाविद्यालय व कवठेमहांकाळ येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कराराअंतर्गत दोन्ही महाविद्यालयातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांची देवाणघेवाण, विविध परिसंवाद, चर्चासत्रे, कार्यशाळा व व्याख्यानामध्ये सहकार्य या बाबींचा समावेश आहे. पुढील पाच वर्ष दोन्ही महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येतील. यामध्ये दोन्हीही महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांच्या सहकार्याने उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढीसाठी वेगवेगळ्या टप्प्यावर शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती डॉ. शिवाजी कांबळे व डॉ. ओंकार कुडाळकर यांनी दिली.
          या सामंजस्य कराराप्रसंगी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. शिवाजी कांबळे तसेच प्रा. नितेश शिंदे, डॉ. सुजाता सोळगे व राजे रामराव महाविद्यालयातील डॉ. ओंकार कुडाळकर उपस्थित होते. हा सामंजस्य करार करण्यामध्ये राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील