'तंत्रज्ञानातील करियरच्या संधी'१०वी, १२वी व महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन, डॉ. रविंद्र आरळी, श्री.अनिल बन्ने व श्री. शिवप्रसाद माळी प्रमुख मार्गदर्शक
'तंत्रज्ञानातील करियरच्या संधी'
१०वी, १२वी व महाविद्यालयीन विद्यार्थी व पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
डॉ. रविंद्र आरळी, श्री.अनिल बन्ने व श्री. शिवप्रसाद माळी प्रमुख मार्गदर्शक
जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २. येथील विवेकानंद इन्स्टिटयुट ऑफ इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजीच्या वतीने १०वी, १२ वी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तसेच पालकांसाठी साेमवार दि. ३ जुलै राेजी सकाळी १०.०० वाजता साईप्रकाश मंगल कार्यालय, विद्यानगर, जत येथे 'इग्नाईटींग यंग २०२३' या तंत्रज्ञानातील करियरच्या संधी या विषयावर करीयर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केल्याची माहीती संस्थेच्या संचालिका व प्राचार्या सौ. उज्वला बोबडे यांनी दिली.
या कार्यशाळेमध्ये उमा चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष व प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी, पुणे येथील डिजीटल ॲनालिटिक्स व्यवस्थापक श्री. शिवप्रसाद माळी, प्रसिध्द युटयुबर व युवा उद्याेजक श्री. अनिल बन्ने मार्गदर्शन करणार आहेत. या शिबीरामध्ये तंत्रज्ञानामुळे विविध क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी निर्माण झालेल्या अमर्याद संधी याविषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच १०वी,१२वीच्या टप्प्यावर पुढील शिक्षणाची, करीयरची दिशा ठरवत असताना, शैक्षणिक शाखा निवडत असताना पालकांची व मुलांची व्दिधा मनस्थिती होत असते. त्याचबरोबर क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी करियर करण्यासाठी स्वतःवर नक्की काय काम करावे लागते हे जाणणे जास्त महत्वाचे असते. ते न समजल्याने प्रत्येक क्षेत्रात पदवी मिळूनही बेकार असलेले अथवा अपेक्षित समाधान न मिळालेले हजारो तरुण आपल्याला दिसतात. त्यामुळे महाविद्यालयीन जीवनात कोणत्या दिशेने आपल्या करीयरचा पाया भक्कम करावा यावर या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन मिळणार आहे.
विवेकानंदमार्फत घेतले जाणारे 'इग्नाईटींग यंग' या उपक्रमाचे नऊवे वर्ष असून तरुणांमधील स्वयंप्रेरणा, आत्मविश्वास प्रज्वलित करून स्वतःमधील क्षमता व कल ओळखून करीअर निवडीच्या विविध संधी, त्याबाबतची माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच विविध क्षेत्रांतील तज्ञांकडून मार्गदर्शन करून करीअरसंदर्भातील पालकांच्या शंकांचेही निरसन करणे हे ध्येय अनुसरून या कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जत तालुक्यातील विद्यार्थी-विद्यार्थींनी व पालकांनी या मोफत कार्यशाळेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी मो.न. 9309821995 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Comments
Post a Comment