चांद्रयान - 3 मोहिम !
उड्डाणासाठी सज्ज झालेय चांद्रयान -3 !
14 जूलै 2023 रोजी 2.30 मि. होणार प्रक्षेपण ! 
स्थळ : सतिश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा

  • येत्या 14 जुलैला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन चांद्रयान 3 चंद्राच्या दिशेने झेपावेल. या मिशनच्या माध्यमातून चंद्रावरील जमीन आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्यात येणार आहे. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग हा या मोहिमेतील सर्वात अवघड टप्पा असणार आहे. चंद्रावर लँडिंगचा भारताचा हा दुसरा प्रयत्न असणार आहे.
  • सुमारे 48 दिवसानंतर 25/26 अ‌ॉगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार #लॅंडर व नंतर #रोव्हर तिथे फिरणार !
  • चंद्रावर उतरणारा 4 था देश म्हणून भारत नावलौकिक मिळवायला उत्सुक आहे !
  • चंद्राच्या पृष्ठभागावरील सहज उतरण्याचे तंत्रज्ञान यशस्वी करणे तसेच तिथे रोव्हर फिरवणे यशस्वी करण्यासोबतच तेथील मातीचे तापमान, रासायनिक परिक्षण अभ्यास करण्याचे प्रमुख ऊद्देश्य ही मोहिम साध्य करेल असा इस्त्रो या संस्थेतील संशोधक, अभियंते यांना आत्मविश्वास आहे !
चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात हे यान उतरणार आहे. चांद्रयान - 2 जिथे उतरणार होते त्या जागे पासून सुमारे 100 किमी अंतरावर चांद्रयान -3 आपला पाडाव टाकेल. 
विविध प्रकारची माहिती गोळा करून भविष्यात चंद्रावरील वसाहत, पाणी यासंदर्भात संशोधनाचा दर्जा वाढेल.
अवकाश संशोधनातील भारताचा हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या मोहिमेचे यश भविष्यातील अनेक शक्यता निर्माण करेल यात शंकाच नाही.
खगोल मोहिमांद्वारे प्रचंड प्रमाणात डाटा (विदा) आपल्याला उपलब्ध होत आहे. त्यामुळे यात संशोधनाच्या विविध संधी भारतीय संगणक, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल अभियंत्यांना तसेच मुलभूत विज्ञानात पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.

चला तर,
या प्रक्षेपण कार्यक्रमाचे आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होवूया !

#जत 
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी