राजे रामराव महाविद्यालयाचे गांधी जयंतीनिमित्त एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान

महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक यामधे सहभागी
जत: दि.२. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज जत शहरातील सुनेत्रा कॉलनी व जिल्हा परिषद मराठी शाळा, इंदिरानगर, जत या ठिकाणी दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या स्वच्छता पंधरवड्याचा भाग म्हणून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सकाळी दहा ते अकरा या एक तासाच्या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम अंतर्गत 'एक तारीख एक तास' (एक तास स्वच्छतेसाठी) हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत जत येथील सुनेत्रा कॉलनी परिसर व जिल्हा परिषद मराठी शाळा, इंदिरानगर या ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये रस्त्यांची व परिसराची साफसफाई, खुरटी झाडे व गवत काढणे, काडीकचरा वेचणे, कागद व प्लास्टिक गोळा करणे याचा समावेश होता.

       एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाचे मार्गदर्शन व नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी व प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. प्रारंभी उपस्थित प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांना कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी स्वच्छतेची शपथ दिली. 

          यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे सदस्य प्राध्यापक अतुल टिके, प्रकाश माळी, राजेंद्र खडतरे, मेहजबीन मुजावर, धनंजय वाघमोडे, सरदार रोहिले, महाविद्यालयाचा कर्मचारी वर्ग यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



#जनसागर 
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी