करियरची दशा आणि दिशा ओळखा: डॉ. रविंद्र आरळी विवेकानंद इन्स्टिट्यूट आयोजित तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. कोणतेच क्षेत्र दुय्यम नसुन, महाविद्यालयीन जीवनात कोणत्या दिशेने आपल्या करियरचा पाया भक्कम करावा, हे स्वतः जाणून स्वतःमध्ये विषयाची आवड निर्माण करा. कष्ट करण्याची मानसिकता ठेवून स्वतःमध्ये असलेल्या गुणांना योग्य पध्दतीने आचरणात आणून चांगले करियर घडवा. शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या करिअरची दशा आणि दिशा ओळखा, असे प्रतिपादन वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक व राजकिय क्षेत्रामध्ये आदर्शवत कार्य करीत असलेले जतमधील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. रविंद्र आरळी यांनी केले. ते विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी या एक दिवशीय करियर मार्गदर्शन शिबिरामध्ये बोलत होते. यावेळी प्रसिद्ध युट्युबर अनिल बन्ने, डिजिटल अनालिस्टिक मॅनेजर शिवप्रसाद माळी व ग्राहक पंचायत महाराष्ट्र, पुणे विभाग उपाध्यक्ष डॉ. विद्याधर किट्टद उपस्थित होते.

          करियरची दशा आणि दिशा ओळखा आणि 'आवड’, 'गरज' व 'जमतं' या तिन्ही गोष्टींचा समन्वय साधुन, बदलते तंत्रज्ञान आत्मसात करत करियरमध्ये उंच भरारी घ्या, असा संदेश तंत्रज्ञानातील विविध संधींचा मागोवा घेत, माहिती तंत्रज्ञानातील एक्सपर्ट शिवप्रसाद माळी यांनी तरुणाईला दिला. 

          माहिती तंत्रज्ञानाचा उचित वापर करून, स्वतःमध्ये असलेले विविध कलागुणांना सोशल मिडीयाद्वारे योग्य पध्दतीने लोकांपुढे सादर करून चांगले अर्थार्जण करता येते. त्यांची युट्युब चॅनेल 'गावाकडची टेस्ट' या रेसिपी चॅनलच्या माध्यमातून १,६६,००० तर संचित टीव्ही न्यूजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेती व शेती तंत्रज्ञान १,२७,००० शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली आहेत. सबस्क्रायबरच्या माध्यमातून युटयुब चॅनेलवर उदयोगविश्व निर्माण केलेले अनिल बन्ने यांनी गावाकडच्या ओघवत्या शैलीत उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. 

         जत येथे विवेकानंद इन्स्टिटयुट आयोजित तंत्रज्ञानातील करिअरच्या संधी या शिबिराला पालक व विद्यार्थ्यांचा अतिशय उत्तम प्रतिसादात लाभला. इग्नाईटींग यंग - करियर मार्गदर्शन शिबीरात या व इतर मान्यवरांनी अभ्यासपुर्ण, अनुभवी व विदर्यार्थ्यांच्या करियरसाठी उपयुक्त असे मार्गदर्शन केले.  या शिबिराप्रसंगी प्रा. तुकाराम सन्नके सर, श्री. अमोल कळस्कर सर, श्री. ओमकार कुडाळकर सर, पत्रकार श्री. नजीरभाई चट्टरकी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच श्री. गिरीश शेजाळ सर यांच्या बहारदार सुत्रसंचालनाने व  प्राचार्या सौ. उज्वला बोबडे व सर्वच विवेकानंद टीमच्या नियाजनाने मार्गदर्शन शिबीर उत्तम पध्दतीने संपन्न झाले.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी