जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत महत्वाची: संभाजीराव सरक, राजे रामराव महाविद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत महत्वाची: संभाजीराव सरक
राजे रामराव महाविद्यालयातील पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न
जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. ५. विद्यार्थ्यांना आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जिद्द, चिकाटी व मेहनत ही अत्यंत महत्त्वाची आहे. "दे रे हरी, खटल्यावरी!" अशी वृत्ती आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे. असे प्रतिपादन संभाजीराव सरक यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या पदव्युत्तर
रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. सतीशकुमार पडोळकर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, करियरसाठी शहरात जाताना आपल्या मनामधील न्यूनगंड बाजूला केला पाहिजे. नक्कीच एकेदिवशी तुम्ही यशाच्या उंच शिखरावर पोहचाल. पण त्यावेळी आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो, हे विसरू नका. यावेळी रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. कृष्णा रानगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक व पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ यांनी एकंदरीत राजे रामराव महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होण्याचा प्रवास व त्यामागील संस्थेची व महाविद्यालयाची भूमिका याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश चौगुले, प्रास्ताविक कोमल पाटील व आभार गौरी मुरकुटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रा. राजेश सावंत, प्रा. प्रा. मेहेजबीन रफिक मुजावर, प्रा. शाहीन पाटील, प्रा. वैशाली मदने, प्रा. अश्विनी पुजारी, प्रा. प्रियांका भुसनुर आदींसह विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment