राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
जत (प्रतिनिधी): दि. १६. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने पारंपारिक वेशभूषा दिन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून पारंपारिक दिन साजरा केला. यामध्ये कोळी पेहराव, केरळी पेहराव, आदिवासी पेहराव, दक्षिण भारतीय पेहराव, धनगरी पेहराव, वारकरी पेहराव इत्यादी वेशभूषांचा समावेश होता. यामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.

      या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, पारंपारिक वेशभूषेचे ज्ञान आजच्या पिढीला व्हावे. आपली परंपरा व संस्कृती याचा अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये एकपात्री अभिनय, उत्कृष्ट वेशभूषा, समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन लघु नाटक इत्यादींचा समावेश होता. यामध्ये चमक दाखवलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे: 
एकपात्री अभिनय: सिद्धी शर्मा प्रथम, पूजा वाघमोडे द्वितीय तर रूपाली फडतरे तृतीय क्रमांक.
उत्कृष्ट वेशभूषा: शुभांगी माने प्रथम, सुजाता सावंत द्वितीय तर सुवर्णा सावंत तृतीय क्रमांक.
वैयक्तिक नृत्य: अंकिता वनखंडे प्रथम, अभिषेक लोहार द्वितीय तर सिद्धी शर्मा तृतीय क्रमांक.
गीत गायन: मयुरी शिंदे प्रथम, प्रियांका कांबळे द्वितीय तर पायल मोगली तृतीय क्रमांक.
समूह नृत्य: बी.ए भाग एक प्रथम, बी.एससी भाग एक द्वितीय तर बी.सी.ए भाग तीन तृतीय क्रमांक.
लघु नाटक: बी.एससी भाग दोन प्रथम क्रमांक.

       या पारंपारिक वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.अशोक बोगुलवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीशकुमार पडोळकर तर आभार प्रा. रवींद्र काळे यांनी व्यक्त केले. या सांस्कृतिक व पारंपारिक वेशभूषा कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर, सांस्कृतिक विभागातील प्रा. लक्ष्मण मासाळ, डॉ. प्रफुल्ल गायकवाड, प्रा. कुमार इंगळे, प्रा. लता करांडे, प्रा. वैशाली मदने, महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील