निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील
राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम सन्नके): दि. २१.  प्राचीन भारतीय संस्कृतीपासुन प्राणायाम, योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची आहेत. आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व जिमखाना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
      यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी "मानवतेसाठी योग" (Yoga for Humanity) ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचा यामध्ये समावेश आहे. तसेच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करणे व झोपेत सुधारणा करण्यासाठी योगाची महत्वाची भूमिका आहे. 
         या आंतरराष्ट्रीय योग दिनाला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. तुकाराम सन्नके, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. पांडुरंग सावंत, जिमखाना प्रमुख प्रा. अनुप मुळे यांसह अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा. दीपक कांबळे, प्रा. राजेंद्र खडतरे, प्रा.अनिल लोखंडे, प्रयोगशाळा सहाय्यक बिराप्पा पुजारी, राष्ट्रीय जिम्नॅस्टिक खेळाडू खुशबू मुजावर, शुभांगी माने, श्री. रामराव विद्यामंदिर व जुनिअर कॉलेजचे शिक्षक व विद्यार्थी, महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

  1. योग ही काळाची गरज आहे. हे आपणास सदृढ शरीर व सुदृढ मन देते. ब्लॉग खूप छान आहे ... हार्दिक अभिनंदन व तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील