राजे रामराव महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा
राजे रामराव महाविद्यालयात जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा
विद्यार्थी व प्राध्यापकांनी घेतली तंबाखू मुक्तीची शपथ
जत (प्रतिनिधी): दि. १. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यात आला. यामध्ये तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या असंसर्गजन्य रोगाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती व तंबाखू मुक्तीची शपथ महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांना देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभर ३१ मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्यातील आरोग्य संस्था, शासकीय, निमशासकीय,खाजगी कार्यालये, शाळा व महाविद्यालयामध्ये या संदर्भात जनजागृती केली जाते. याचाच भाग म्हणून जत येथील राजे रामराव महाविद्यालयामध्ये यासंदर्भात जनजागृती करण्यात आली व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी उपस्थितांना जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त तंबाखू मुक्तीची शपथ दिली.
या जनजागृती कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी, डॉ. राजेंद्र लवटे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. शिवाजी कुलाळ, महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


Comments
Post a Comment