राजे रामराव महाविद्यालयात राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन संपन्न
राजे रामराव महाविद्यालयात राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन संपन्न
इंग्रजी व सांस्कृतिक विभागाच्या वतीने यशस्वी आयोजन
जत/प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २७. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग, सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. २६ एप्रिल २०२३ रोजी राज्यस्तरीय देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी स्पर्धकांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व कन्नड या भाषेतील विविध देशभक्तीपर गीते सादर केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील तर अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागप्रमुख प्रा. रामदास बनसोडे उपस्थित होते.
देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आहे. याला प्रतिसाद म्हणून राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभाग व सांस्कृतिक विभागाने या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मयुरी शिंदे, द्वितीय क्रमांक रेश्मा शिंदे, तृतीय क्रमांक पायल मोगली तर उत्तेजनार्थ क्रमांक पिरगोंडा तळसंगी व वैजयंती शिंदे यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण १९ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा.रामदास बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तुकाराम सन्नके तर आभार कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. परमेश्वर थोरबोले यांनी व्यक्त केले. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अशोक बोगुलवार, स्पर्धेचे परीक्षक प्रा.ओंकार कुडाळकर, डॉ. सतीशकुमार पडोळकर, प्रा विजय यमगर व स्पर्धक विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment