शाश्वत शेतीमुळे ग्रामसमृद्धी शक्य: मनोज वेताळ
शाश्वत शेतीमुळे ग्रामसमृद्धी शक्य: मनोज वेताळ
खलाटीत राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये मनोगत
जत/प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.४. शाश्वत व विषमुक्त शेती केल्यामुळे शेतकऱ्याचीच नव्हे तर संपूर्ण गावाची ग्रामसमृद्धी शक्य असल्याचे प्रतिपादन जतचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वतीने मौजे खलाटी, ता. जत येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून दऱ्याप्पा शेजुळ उपस्थित होते.
अधिक बोलताना मनोज वेताळ म्हणाले, की भारत हा कृषिप्रधान देश आहे. शासनाच्या विविध योजना ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या शेतीबरोबरच ग्रामसमृद्धी कशी निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करावे. आपल्या अध्यक्ष भाषणात शेजुळ म्हणाले, खलाटी गावातील शेतकरी शासनाच्या विविध योजना आपल्या बांधापर्यंत कशाला राबवल्या जातील यासाठी सतर्क राहतील व आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या मार्फत शाश्वत शेती केली जाईल.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अतुल टिके सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके तर आभार प्रा. पुंडलिक चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, बंडू शेजुळ, दगडू शेजुळ, ज्ञानेश्वर देवकते, दादासो शेजुळ, भाऊसाहेब पाटील, पोपट कोळी, ज्ञानेश्वर तुकाराम देवकते, अशोक लवटे, राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्राध्यापक, बाळासो पुजारी, व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment