लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मूल्याधारित पत्रकारिता आवश्यक: रवींद्र माने

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मूल्याधारित पत्रकारिता आवश्यक: रवींद्र माने
राजे रामराव महाविद्यालयात डिजीटल पत्रकारिता यावर वेबिनार संपन्न
जत/प्रतिनिधी: दि. ६. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या हिंदी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल पत्रकारिता' प्रमाणपत्र कोर्स अंतर्गत एकदिवसीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दैनिक लोकसत्ता डिजीटल माध्यम विभागाचे (इंडियन एक्स्प्रेस माध्यम समूह) उपसंपादक श्री.रवींद्र माने उपस्थित होते.
      ' डिजीटल पत्रकारिता: स्वरूप,मूल्ये व आव्हाने ' यावर बोलताना ते म्हणाले, 'आज पत्रकारिता हा एक व्यवसाय जरी असला तरीही त्याची काही मूल्ये आहेत. भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी मूल्याधारित पत्रकारिता गरजेची आहे.' या वेबीनारचे अध्यक्ष प्राचार्य प्रा. डॉ.सुरेश पाटील यावेळी बोलताना म्हणाले, 'आज पत्रकारिता हे व्यवसायाचे माध्यम जरी बनले असले तरी ज्या मूल्यांना केंद्रीभूत मानून पत्रकारिता सुरू झाली त्या मूल्यांशी पत्रकारितेने फारकत घेतल्यास भारतीय लोकशाहीचा गाभाच नष्ट होईल.' यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. शिवाजी कुलाळ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना असे प्रतिपादन केले की, 'पत्रकारिता समाजाला माहितीचे आदान- प्रदान करीत असते. त्या माहितीवर समाजाचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे पत्रकारितेला नैतिक अधिष्ठान असावे.' 
         या वेबीनारचे स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रा.एच.डी.टोंगारे यांनी केले. सूत्रसंचालन समन्वयक डॉ. सतीशकुमार पडोळकर यांनी केले. या वेबिनारप्रसंगी प्रा.प्रकाश माळी, प्रा.शिवानंद माळी, प्रा. मुलाणी, प्रा.रेश्मा लवटे  आदींसह ' डिजीटल पत्रकारिता ' प्रमाणपत्र कोर्ससाठी प्रवेशित  महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी