भावना व कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम म्हणजे कविता: डॉ. सतीशकुमार पडोळकर

भावना व कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम म्हणजे कविता: डॉ. सतीशकुमार पडोळकर
खलाटीत कवी संमेलन उत्साहात संपन्न
जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.७. कवी आपल्या भावना कल्पनांच्या आधारे व्यक्त करतो. तो काल्पनिक गोष्टी वास्तव रूपाने वाचकांपुढे मांडतो. म्हणूनच भावना व कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम कविता आहे, असे प्रतिपादन डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे खलाटी, ता. जत येथील साप्ताहिक विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये सहाव्या दिवशी कवी संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे उपस्थित होते.
      आपल्या भाषणात पडोळकर म्हणाले, कविता हा साहित्याचा सर्वात जुना प्रकार असून कमी शब्दांमध्ये जास्त आशय देणारा हा साहित्य प्रकार आहे. मनामध्ये चाललेला भावनांचा खेळ कवी शब्दरूपी गोष्टीतून व्यक्त करतो, यालाच कविता म्हणतात. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र लवटे यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी कवींचा शब्दरूपी आढावा घेतला. यामध्ये विल्यम वर्डसवर्थ, रॉबर्ट फ्रॉस्ट, विल्यम शेक्सपियर, कुसुमाग्रज, बहिणाबाई चौधरी, सुमित्रानंदन पंत, व निराला इत्यादी कवींचा समावेश होता. 
       या कवी संमेलनाला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यामध्ये अंकिता कोळेकर, ॲड.संदीप कोळी, महेश गुरव, डॉ. ओमकार कुडाळकर, प्रा. रामदास बनसोडे .प्रा. तुकाराम सन्नके, प्रा. अतुल टिके, प्रा. लता करांडे, प्रा.सोनाली पटेकर, कु.उज्वला कांबळे, सोनाली सावंत, सोनाली क्षीरसागर, शिवांजली चिंतामणी, मृदुला सावंत, पूजा वानखेडे, अक्षता व्हनखंडे, दीक्षा चव्हाण, वसुधा शिंदे, सारिका कोडग, काजल पाटोळे, रूपाली फडतरे, स्वप्नाली पाटोळे, सानिका लवटे, सागर पिरगोंड, बिरुदेव सदाकाळे इत्यादींनी कविता सादर केल्या.
       या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ज्योती नाईक, सूत्रसंचालन प्रमिला भिरडकर तर आभार सारिका माने हिने व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. कृष्णा रानगर, डॉ. शिवाजी कुळाल, डॉ. भीमाशंकर डहाळके, बापु सावंत, गावातील शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेतील सदस्य प्राध्यापक, बाळासो पुजारी, व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी