जतेत महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे

जतेत महाविद्यालयीन तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे
राजे रामराव महाविद्यालयामध्ये महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
जत प्रतिनिधी (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २९. देशभरातील महाविद्यालयीन तरुणी व महिला यांच्यावरील वाढते हल्ले, छेडछाडीचे प्रकार, अत्याचार व मारहाण पाहता राजे रामराव महाविद्यालयाच्या महिला सबलीकरण विभागाच्या वतीने 20 ते 30 मार्च या कालावधीमध्ये दहादिवसीय महिला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व कार्यक्रमाच्या समन्वयिका प्रा. लता करांडे यांनी दिली. 
         अधिक बोलताना ते म्हणाले, या दहादिवशीय महिला स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरामध्ये जतमधील प्रसिद्ध योगशिक्षिका अनुराधा संकपाळ त्याचबरोबर कराटे प्रशिक्षक शितल बामणे व महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनुप मुळे 50 निवडक विद्यार्थिनींना योगा, कराटे व लाठी-काठी यासारखे स्वसंरक्षणासाठी उपयुक्त प्रशिक्षण देतील. स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणींना सक्षम बनवण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचेही यावेळी बोलताना ते म्हणाले. 
         या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. अशोक बोगुलवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. शिवाजी कुलाळ, त्याचबरोबर महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी