सबाल्टर्न इतिहासकार साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे
सबाल्टर्न इतिहासकार साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे इतिहासाचे चिंतक होते. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत सबाल्टर्न जाणीवा दिसून येतात. कारण साहित्य हे समाज परिवर्तनाचे फार मोठे साधन आहे. याची जाण अण्णा भाऊ साठे यांना होती. त्यामुळेच त्यांच्या साहित्यकृतीतून या सर्व गोष्टीवर प्रकाश पडतो. इतिहासकार डी.डी. कोशंबी यांनी सांगितल्याप्रमाणे केवळ राजा, थोर पुरुष हे इतिहास घडविणारे घटक नाहीत तर खऱ्या अर्थाने उत्पादक व कामगार हे समाज घडविणारे घटक आहेत असे म्हटले आहे. त्यानुसार उपेक्षित समाजाच्या अभ्यासकांच्या मते, उपेक्षित समाजाचा इतिहास लिहिला पाहिजे. कारण यादेशातील कनिष्ठ व तुच्छ व्यक्ती शेवटी मनुष्यच आहेत. ते समाजाचे घटक आहेत. त्यांच्यातील जिवंतपणा, विचारशक्ती व प्रगतीची धडपड लक्षात घेतल्यास हा घटक डावलून जगाच्या इतिहासाला पूर्णत्व येणार नाही. कारण उपेक्षित व्यक्तींनी शोषणाविरुद्ध प्रतिकारच्या चळवळी उभ्या केल्या. त्यामुळे सर्वच पातळीवर होणाऱ्या घडामोडी उलगडून दाखविण्याची ताकद व निर्भीडपणा उपेक्षितांच्या ...