निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा जत (प्रतिनिधी प्रा. तुकाराम सन्नके): दि. २१. प्राचीन भारतीय संस्कृतीपासुन प्राणायाम, योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम व योगासने महत्त्वाची आहेत. आपल्या आरोग्याच्या सुदृढतेसाठी हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व जिमखाना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यंदा आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२३ साठी "मानवतेसाठी योग" (Yoga for Humanity) ही संकल्पना आहे. शरीर, मन, समाज आणि अगदी आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी योगाचे विशेष महत्त्व आहे. योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये शरीराची लवचिकता, स...