तरूण वयातचं जीवनाची दिशा कळते: शाहिर रणजित कांबळे
राजे रामराव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न
जत प्रतिनिधी : दि.१८. समाज माध्यमाच्या या युगात तरुण विद्यार्थी सैरभैर झाले असून विद्यार्थ्यांनी शिक्षण, आरोग्य, आपली आवड, व करियर याकडे लक्ष दिले पाहिजे. शिक्षणाचा आनंद घेत व आपली आवड जोपासत या वयातचं जीवनाची दिशा कळायला मदत होते, असे प्रतिपादन विद्रोही शाहिर व प्रेरक वक्ते रणजित आशा अंबाजी कांबळे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष प्रा. महादेव करेन्नवर उपस्थित होते.
. अधिक बोलताना ते म्हणाले, आजच्या तरूणांमध्ये प्रचंड उर्जा आहे. या उर्जेचा वापर चांगल्या कार्यासाठी केला तर जीवन सुखी व आनंदी होते. खडतर परीस्थितीतुनच माणसाची समृद्धी होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचे व्यवस्थापन करून आपले जीवन घडवावे. प्रारंभी विद्यार्थ्यांनी केलेल्या लिखित व मुद्रित शेला-पागोटा यांचे वाचन व सादरीकरण महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केले. त्यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रम सुरू झाला. शारीरिक शिक्षण संचालक प्रा.अनुप मुळे व प्रा.अभिजीत चव्हाण यांनी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा अहवालाचे वाचन व वर्षभरात क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष यांच्या वतीने प्रा. रवींद्र काळे यांनी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अहवालाचे वाचन करून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये केलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. यामध्ये राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) च्या चौथ्या पर्वाची तयारी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, मुक्तपीठ, एक तास ग्रंथालयात, आंतरवाशिता, कला, क्रिडा, सांस्कृतिक व संशोधन याचा समावेश होता.
. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. विद्यावाचस्पती ही सर्वोच्च पदवी मिळवणारे डॉ. नारायण सकटे, एम. फिल ही पदवी प्राप्त केलेले प्रा. तुकाराम सन्नके, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विशेष कक्ष स्थायी समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल डॉ. राजेंद्र लवटे, यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेली प्रांजल सावंत, राज्यस्तरीय सायकलींग स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेले दत्तात्रय चौगुले, सुशांत मंडले, शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय २० किमी चालणे या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवलेली सुवर्णा सावंत, शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय भालाफेक स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवलेला राहील नदाफ, सांगली जिल्हा ३ किमी धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवलेली श्रुती कोकरे, सांगली विभागीय १०० मीटर मैदानी स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त अनिता मोरे, सांगली जिल्हा ४०० मीटर धावणे तृतीय क्रमांक प्राप्त श्रुती संती, लांब उडी तृतीय क्रमांक प्राप्त सुशांत शिंगाडे, ४०० मीटर हर्डल्स क्रीडा प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त ज्ञानेश्वर घुमरे, ४×१०० मीटर रिले प्रथम क्रमांक प्राप्त रोहन निकम, श्रीकांत शिंदे, बंडू हटकर, बापू सुर्वे व कुमार खडतरे, ४×४०० मीटर रिले द्वितीय क्रमांक प्राप्त स्वप्निल कदम व सचिन ओलेकर व चतुर्थ क्रमांक प्राप्त पूजा वाघमोडे, राधिका यादव व रूपाली फडतरे, सांगली जिल्हा कबड्डी स्पर्धेत चमक दाखवणारे आकाश नाईक, श्रीकांत पवार याचबरोबर कनिष्ठ विभागातील यशस्वी व गुणवंत खेळाडूंचा प्रमुख पाहुणे व अध्यक्षांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
मागील वर्षातील गुणवंत विद्यार्थी म्हणून कनिष्ठ विभागातून अश्विनी पाटील, अमृता काळे, धनुजा कोळेकर, वरिष्ठ कला शाखेतून मालती वाघमोडे, पुनम शिंदे, भाग्यलक्ष्मी कांगोणे, विद्याश्री हुचगोंड, प्रणाली कोडग, अमृता घेज्जी, प्राजक्ता शिंदे, वाणिज्य शाखेतून ज्योती माळी, विज्ञान शाखेतून मालाश्री बिरादार, विद्या बेंद्रे, अर्शिया शेख, सुप्रिया साळे, पदव्युत्तर पदवी शाखेतून पूजा माळी, सुप्रिया बाबान्नवर यांनी बाजी मारली. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून राज्यस्तरीय पथ संचलनामध्ये सहभागी सारिका माने, राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त उज्वला कांबळे, राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून यश संपादन केलेले रोहन निकम, दयानंद मासाळ, सागर शेजुळ, सुनील जाधव, प्रसाद जाधव, सुशांत थोरात, सुहास भोसले, किरण रुपनर, सानिका सावंत, शुभांगी माने यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी तर प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. अशोक बोगुलवार यांनी करून दिली. सूत्रसंचालन प्रा. धनंजय वाघमोडे व प्रा.अतुल टिके यांनी तर आभार प्रा. मेहजबिन मुजावर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले, प्रा. श्रीमंत ठोंबरे, प्रा. सिद्राम चव्हाण, प्रा. शिवाजी चव्हाण, राजेंद्र माने, वसंतराव मोरे यासह श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विविध संस्कार केंद्रातून सेवानिवृत्त झालेले शिक्षक व कर्मचारी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment