राजे रामराव महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

विद्रोही लोकशाहीर रणजित कांबळे प्रमुख पाहुणे म्हणून  राहणार उपस्थित
जत (प्रतिनिधी): दि. १५. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३- २४ या वर्षभरात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाचा गौरव करण्यासाठी व क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या विविध स्पर्धेत गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी राजे रामराव महाविद्यालयाने वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजता आयोजित केला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे कार्याध्यक्ष तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. महादेव करेन्नवर यांनी दिली. 

         वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्रोही लोकशाहीर व प्रेरणादायी वक्ते रणजित आशा अंबाजी कांबळे उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे, श्रीमंत जोत्स्नाराजे डफळे, श्रीमंत शार्दुलसिंहराजे डफळे याबरोबर जत शहर व जत पंचक्रोशीतील माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने शुक्रवार दि. १६ रोजी गुणवंत विद्यार्थी, खेळाडू व प्राध्यापक यांचा सत्कार व शेलापागोटे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. महादेव करेन्नवर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना प्रमुख प्रा.अनुप मुळे, प्रा.अभिजीत चव्हाण व प्रा.दीपक कांबळे पाहत आहेत.


#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी