साक्षी इळगेर हिची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणुन निवड


राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची भुदल सेनेमध्ये भरती
जत दि. 22 (प्रतिनिधी) राजे रामराव महाविद्यालय,जत येथिल राष्ट्रीय छात्र सेना, शारीरिक शिक्षण व इंग्रजी विभागाची विद्यार्थिनी कु.साक्षी सतिश इळगेर हिची भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणुन निवड झाली आहे. तिच्या ह्या निवडीबद्दल राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी तिचा सत्कार करुन अभिनंदन केले. 
        कु.साक्षी ही मूळची नागज, ता. कवठेमहांकाळ, येथील असून तिच्या लहानपणीच आई-वडीलांचे निधन झाले आहे. अनाथ झाल्याने जत येथील भगिनी निवेदिता मुलींचे बालग्रह या ठिकाणी तिचे संगोपन व 12 वी पर्यंतचे शिक्षण झाले. सध्या ती मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, जत येथे राहते. कु.साक्षी ही राजे रामराव महाविद्यालयात बी.ए भाग दोनमध्ये शिकत आहे. शिक्षण घेत असतानाच ती महाविद्यालयातील विविध स्पर्धा, खेळ, राष्ट्रीय छात्र सेना इत्यादी मध्ये सहभाग नोंदवत होती. अथक प्रयत्न व प्रामाणिक कष्ट यामुळेच तीची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून भरती झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश मिळते असे उद् गार  राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील यांनी व्यक्त केले.
कु.साक्षीने सुरुवातीला भरती परीक्षा दिली. त्यानंतर घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीत ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया व मेडिकल झाले. या सर्व टप्प्यातील कामगिरी पाहून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली गेली, आणि त्यानुसार तिची अग्निवीर जनरल ड्युटीसाठी निवड झाली आहे. पुणे विभागातून एकुण चार विद्यार्थ्यांनीची निवड झाली असून  त्यापैकी कु.साक्षी हिची अव्वलस्थानी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल १६ महाराष्ट्र बटालियन सांगलीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चंद्रशेखर साठे, ॲडम ऑफिसर कर्नल अभिजीत बर्वे, कॅप्टन प्रा.पांडूरंग सावंत, सुभेदार मेजर सर्जेराव जाधव व सर्व पीआय स्टाफ तसेच राजे रामराव महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंदानी व विद्यार्थी  विद्यार्थीनींनी  तिचे अभिनंदन करुन भावी कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी