राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे विविध स्पर्धेत यश

आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय काव्यवाचन व कथाकथन स्पर्धेत उज्वला कांबळे, सुवर्णा सावंत द्वितीय तर सानिका लवटे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम तसेच गुरुदेव कार्यकर्ता गटातून प्रा. उमेश कांबळे चित्रकला स्पर्धेत द्वितीय

जत प्रतिनिधी: दि. १. शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर व मराठी विभाग, आजरा महाविद्यालय, आजरा आयोजित आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय मराठी काव्यवाचन व कथाकथन स्पर्धा दि. २३ जानेवारी २०२४ रोजी पार पडल्या. या स्पर्धेमध्ये राजे रामराव महाविद्यालय, जत येथे बी. कॉम भाग 3 व बी.एससी भाग एक मध्ये शिकत असलेल्या उज्वला कांबळे व सुवर्णा सावंत या नव-साहित्यिकांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका सारिका माने हिने राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथ संचलनामध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल तिचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याबरोबरच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित विवेकानंद सप्ताहानिमित्त तासगाव येथील स्वामी रामानंद भारती हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सानिका वसंत लवटे हिने प्रथम क्रमांक तर सुवर्णा सावंत  हिने तृतीय क्रमांक पटकाविला. त्याचबरोबर गुरुदेव कार्यकर्ता गटातून प्रा. उमेश कांबळे यांनी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पटकाविला. या सर्वांच्या यशाबद्दल राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 
        आंतरमहाविद्यालयीन राष्ट्रीय काव्यवाचन व कथाकथन स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून स्पर्धकांनी भाग घेतला होता. मात्र उत्तम स्वरचित सादरीकरणामुळे या दोन्हीही विद्यार्थिनींनी भरघोस यश संपादन केले आहे. या स्पर्धेत नवकवयत्री उज्वला कांबळे हिच्या "जागे व्हा युवकांनो" या स्वरचित कवितेला व सुवर्णा सावंत हिच्या स्वरचित "रक्ताचं नातं" या कथाकथन सादरीकरणाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. या सर्व विद्यार्थिनींना सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अशोक बोगुलवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, प्रा.पुंडलिक चौधरी प्रा. तुकाराम सन्नके, तसेच डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यासह महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागातील सदस्य प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले.


#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी