प्रोफेसर डॉ. सुरेश पाटील यांची प्राचार्य पदी निवड
जत प्रतिनिधी: दि.१६. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित राजे रामराव महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रोफेसर डॉ. सुरेश सोपानराव पाटील यांची निवड झाली आहे. दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी संस्थेतील विविध महाविद्यालयात प्राचार्य पदासाठी मुलाखती पार पडल्या. यामध्ये प्रोफेसर सुरेश पाटील यांची राजे रामराव महाविद्यालयाच्या पूर्णवेळ प्राचार्य पदी नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज प्राचार्य पदाचा कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी राजे रामराव महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा तीन वर्ष कारभार सांभाळला होता. प्रभारी प्राचार्य काळात त्यांनी महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. याची दखल घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची निवड प्राचार्य पदी केली आहे.
पूर्णवेळ प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल ते म्हणाले की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार यापुढील काळात राजे रामराव महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास व राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (नॅक) च्या चौथ्या पर्वात चांगले मूल्यांकन मिळवणे हे ध्येय आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.महादेव करेन्नवर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेंद्र लवटे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. कृष्णा रानगर, डॉ. भिमाशंकर डहाळके, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.अशोक बोगुलवार, जिमखाना विभाग प्रमुख प्रा. अनुप मुळे तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे.
प्रोफेसर सुरेश पाटील यांना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, सहसचिव (अर्थ) प्राचार्य सिताराम गवळी, सांगली जिल्हा विभागप्रमुख प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांचे मार्गदर्शन लाभले.
#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment