वाचनामुळे प्रेरणा व आत्मविश्वास वाढीस मदत होते: कवी लवकुमार मुळे
राजे रामराव महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न जत दि. 27 (प्रतिनिधी) महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांनी विविध विषयाचा अभ्यास व वाचन केले पाहिजे. आपण वाचले तरच लिहू शकतो. वाचनामुळे प्रेरणा निर्माण होऊन आत्मविश्वास वाढीस मदत होते, असे प्रतिपादन कवी लवकुमार मुळे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील हे उपस्थित होते. अधिक बोलताना कवी लवकुमार मुळे म्हणाले की, मराठी भाषा गौरव दिन साजरा करीत असताना वाचनाच्या माध्यमातून एकमेकांशी सुसंवाद साधता आला पाहिजे. विविध प्रसार माध्यमामुळे मानवामध्ये सुसंवाद कमी झाला असून तो मानसिक आरोग्यासाठी धोका आहे. यावेळी त्यांनी विविध स्वरचित कविता गाऊन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी विविध पुस्तकांचे उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांच्...