जतमधे पंचप्रण शपथ, जनजागृती रॅली व महावृक्षारोपण संपन्न, राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजन



जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि. २१. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुतात्म्यांच्या स्मरणार्थ 'माझी माती माझा देश' या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेद्वारे देशाच्या अमृत महोत्सव समाप्तीच्या निमित्ताने प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम राबवले जात आहेत. याला प्रतिसाद म्हणून जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांना पंचप्रण शपथ देण्यात आली. त्याचबरोबर जत शहरातून रॅली काढून पर्यावरण रक्षण, प्रदूषण नियंत्रण, प्लास्टिक मुक्ती, शाश्वत शेती, साफसफाई व स्वच्छता या संदर्भात जनजागृती करण्यात आली. यानंतर तालुका कृषी चिकित्सालय तथा तालुका कृषी कार्यालय परिसरामध्ये प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपणास सुरुवात झाली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मिळून तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरामध्ये २००० पेक्षा जास्त विविध झाडांचे वृक्षारोपण केले.
       या वृक्षारोपण कार्यक्रमावेळी तालुका कृषी अधिकारी सुनील सातपुते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यास पंतप्रधान कृषी सन्मान योजना सुरू असून याचबरोबर केंद्र व राज्य शासनाची विविध अनुदाने व कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांसाठी सुरू असून याचा लाभ घेण्यास आपण त्यांना मदत व प्रवृत्त करावे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महाविद्यालयाचे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी आज वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. कोरोना काळात ऑक्सिजनची कमतरता सर्वांना भासली. आता प्रत्येकाने एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे. नैसर्गिक ऑक्सिजन आपण झाडांपासूनच घेतो. याचाच अर्थ आपण पर्यावरणाचे व वसुंधरेचे झाडे लावून रक्षण केले पाहिजे. शासनाच्या विविध योजना व अनुदाने आपल्या शेतकरी आई-वडिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपणही यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 

        या पंचप्रण शपथ, जनजागृती रॅली व महावृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, तालुका कृषी अधिकारी सुनिल सातपुते, कृषी पर्यवेक्षक संतोष दराडे, कृषी विभागाचा अधिकारी वर्ग, मंडळ अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुळाल, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. कुमार इंगळे, प्रा. अतुल टिके, प्रा. प्रकाश माळी, प्रा. राजेंद्र खडतरे, प्रा. तेजस गवळी, प्रा. लता करांडे, डॉ. परमेश्वर थोरबोले, प्रा. अभिजीत चव्हाण, प्रा. अनुप मुळे, प्रा. धनंजय वाघमोडे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील