राजे रामराव महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील महापुरुषांवर आधारित नाण्यांचे प्रदर्शन, इंग्रजी विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजन

जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा व आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राजे रामराव महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर आधारित व स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात देश घडविण्यामध्ये आपले अतुलनीय योगदान दिले, अशा महान विभूती व महापुरुषांवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने प्रदर्शित केलेल्या नाण्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सिंहाचा वाटा असलेल्या अशा स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची ओळख व्हावी, हा या प्रदर्शनाचा उद्देश होता. त्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा. सिद्राम चव्हाण व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कुलाळ उपस्थित होते.
         यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक महान विभूतींचा खारीचा वाटा आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अशा महापुरुषांच्या कार्याची ओळख, त्यांचे स्मरण व विचार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा या प्रदर्शनाचा उद्देश अतिशय स्तुत्य आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक लोकांनी जीवाची परवा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. यातील निवडक महान विभूतींवर रिझर्व बँक ऑफ इंडियाने नाणी तयार केली आहेत. त्याचे प्रदर्शन या निमित्ताने राजे रामराव महाविद्यालयाच्या शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे भाषा प्रयोगशाळेत आयोजित केले, ही एक अभिनंदनीय गोष्ट आहे. तत्पूर्वी कु. दीक्षा लवटे, पूजा वाघमोडे, स्वप्नाली बामणे व स्वप्नाली घाडगे- पाटील यांनी आजादी का अमृत महोत्सव व स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या महापुरुषांची माहिती उपस्थितांना दिली.
        या प्रदर्शनाचे स्वागत व प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.रामदास बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन कु. ऋतुजा सपताळ हिने तर आभार कु. ज्योती नाईक हिने व्यक्त केले. या कार्यक्रमाला इंग्रजी विभागातील प्राध्यापक तुकाराम सन्नके, डॉ.ओंकार कुडाळकर, प्रा. विजय यमगर, डॉ. परमेश्वर थोरबोले तसेच हिंदी विभागातील डॉ. सतीशकुमार पडोळकर, भूगोल विभागातील प्रा. लक्ष्मण मासाळ यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील