राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वाची भूमिका: डॉ. राजेंद्र लवटे, राजे रामराव महाविद्यालयात ११ दिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेला प्रारंभ
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके): दि.१७. राष्ट्रीय सेवा योजना ही भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयामार्फत चालवली जाणारी भारतातील सर्वांत मोठी युवकांची संघटना असून याअंतर्गत देशभरातील ४५ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचे संघटन झाले आहे. सामुदायिक सेवेद्वारे व्यक्तिमत्त्व विकास,
वृक्षेरोपण, जलसंधारण, श्रमसंस्कार शिबिर, स्वावलंबन, श्रमाचे मूल्य, संभाषण कौशल्य, ग्रामीण जन जीवनाचा अनुभव यामुळे राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्याल जीयाच्या विद्यार्थी विकास मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन व अकरा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी राष्ट्र निर्मितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका याविषयी व्याख्यानात माहिती देताना बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.
अधिक माहिती देताना डॉ . लवटे म्हणाले, राष्ट्रीय एकता शिबिर, साहसी शिबिर, प्रजासत्ताक दिन शिबिर, राज्यस्तरीय गड संवर्धन, स्वच्छ भारत, जल संवर्धन शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक महाविद्यालयीन स्तरापासून ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत काम करू शकतो. यामधून प्रगल्भ राष्ट्रभक्ती, एकता, एकात्मता, समाजसेवा व नेतृत्व गुण तयार होतात. याचाच फायदा भावी नागरिक घडविण्यामध्ये होतो. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश पाटील म्हणाले, आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्त्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवाशक्तीला नवचेतना देण्याचे कार्य हे देशातील राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. येणाऱ्या शैक्षणिक वर्षांमध्ये प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा व सहभागी होऊन कार्य करावे, असे आव्हानही यावेळी बोलताना त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अतुल टिके तर आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. तुकाराम सन्नके यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व सदस्य प्राध्यापक, महाविद्यालयातील इतर विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जत
#राजे रामराव महाविद्यालय, जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment