स्पर्धा परीक्षा हा करिअरचा उत्तम राजमार्ग: प्रा. रेश्मा लवटे
जत दि.30 (प्रतिनिधी: प्रा. तुकाराम उमेश सन्नके) स्पर्धा परीक्षा हा करिअरचा राजमार्ग असून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशाला हमखास गवसणी घालता येते. मात्र ९० ते ९५ टक्के विद्यार्थी अभ्यास न करता या परीक्षांना सामोरे जातात. अशा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा या मृगजळ ठरत असल्याचे प्रतिपादन प्रा. रेश्मा लवटे यांनी केले. त्या राजे रामराव महाविद्यालय, जत येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अकरा दिवसीय विद्यार्थी उद्बोधन शिबिरामध्ये 'स्पर्धा परीक्षा व करिअरच्या संधी' या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास मंडळाचे समन्वयक डॉ.भिमाशंकर डहाळके उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा हा करियरचा राज्यमार्ग वाटत असला तरी तो तितका सोपा नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत व परिश्रम घ्यावे लागतात, असे सांगून प्रा.रेश्मा लवटे यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व नियोजन कसे करावे व स्पर्धा परीक्षेचे प्रकार याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ...