राजे रामराव महाविद्यालयात रामराव दिनानिमित्त विविध उपक्रम
जत संस्थांनचे भूतपूर्व नरेश श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) दि.१४. येथील राजे रामराव महाविद्यालयात जत संस्थानचे भुतपूर्व नरेश ज्यांच्या नावाने १९६९ साली जत तालुक्यातील पहिले अनुदानित महाविद्यालय सुरू झाले ते श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांची पुण्यतिथी 'रामराव दिन' म्हणून साजरी होते. या निमित्ताने महाविद्यालयात रामराव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे माजी प्राचार्य प्रमोद पोतनीस यांचे 'जत संस्थांनचे अधिपती श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांचे कार्य' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत शार्दुलराजे डफळे, श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते. प्रारंभी उपस्थितांच्या शुभहस्ते शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे व श्रीमंत राजे रामराव महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनात माजी प्राचार्य पोतनीस म्हणाले, श्रीमंत राजे रामराव महाराज डफळे यांचे राजपुत्र श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांनी जत तालुक्यात गोरगरिबांच्या मुलांची उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी सांळुखे यांनी स्थापन केलेल्या श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरला तेवीस एकर जमीन व ऐतिहासिक इमारत दान देऊन श्रीमंत राजे रामराव महाराज यांच्या नावाने राजे रामराव महाविद्यालय सुरु केले. जत सारख्या दुष्काळी भागामध्ये शिक्षणाची सोय व्हावी म्हणून राजे रामराव महाराजांनी १८८५ साली जत संस्थानात प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरु करुन शैक्षणिक कार्याला उत्तेजन दिले होते. राजे रामराव महाराजांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला अभिवादन करण्यासाठी श्रीमंत राजे रामराव महाराजांची पुण्यतिथी "रामराव दिन" म्हणून विविध उपक्रमांनी साजरी करण्याची प्रथा पडली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पाटील म्हणाले, राजे रामराव महाराज व राजे विजयसिंह महाराज यांच्या उदार दातृत्वातून व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रयत्नातून या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. वर्षांनुवर्षे दुष्काळी असणाऱ्या या भागातील गोरगरिबांच्या मुलांना उच्च शिक्षणाची सोय यामुळे झाली.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. अशोक बोगुलवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लता करांडे तर आभार डॉ. परमेश्वर थोरबोले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
# जत
# जनसागर
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके
Comments
Post a Comment