अचकनहळळीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर

राजे रामराव महाविद्यालयाचे १५० स्वयंसेवक व प्राध्यापक होणार सहभागी
जत/प्रतिनिधी: दि. २७. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे "स्वच्छ भारत अभियान" हे ब्रीद घेऊन मौजे अचकनहळळी, ता. जत येथे गुरूवार दि.२८ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
        अधिक बोलताना ते म्हणाले, गुरूवार दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी स. १० वा. शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी जतचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अचकनहळळी गावच्या सरपंच सौ. सुनंदा कोळी, उपसरपंच सौ. महादेवी कोळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. सदर निवासी शिबिरात स्वयंसेवक ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्षलागवड, गावाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण व पशुधन आरोग्य तपासणी व सर्वेक्षण करणार आहेत. तसेच दररोज गटचर्चा, व्याख्यानमाला, विविध गुणदर्शन स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन केले असून अचकनहळळी व परिसरातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र लवटे, प्रा. पुंडलिक चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले आहे.

       या विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये आमदार विक्रमसिंह सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तहसीलदार जीवन बनसोडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर, जत पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान घुगे, साहित्यिक व कवी लवकुमार मुळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे इब्राहिम नदाफ व विनायक माळी, ग्राहक चळवळीचे डॉ. विद्याधर किट्टद तसेच डॉ. सतीशकुमार पडोळकर हे विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

          सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम व नियोजन अचकनहळळी गावच्या सरपंच सौ. सुनंदा कोळी, उपसरपंच सौ. महादेवी कोळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, श्री बिसल सिद्धेश्वर देवस्थान समिती, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, गावातील जेष्ठ नागरिक, तरूण मंडळे, अंगणवाडी सेविका, शिक्षक, शासकीय अधिकारी, कर्मचारी, आजी-माजी सैनिक व विद्यार्थी व ग्रामस्थ करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

गुरू-शिष्य ही प्राचीन परंपरा: प्राचार्य डॉ. सुरेश पाटील