यशस्वी करीयरसाठी विविध कौशल्ये आत्मसात करा: माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले

सारथी मोफत डिप्लोमा कोर्स प्रथम बॅचचा विवेकानंद इन्स्टिट्यूट जत येथे शुभारंभ
जत (प्रतिनिधी) दि. ४. कौशल्यावर आधारीत शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होवुन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सुरु असलेल्या मोफत डिप्लोमा प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध कौशल्ये आत्मसात करून यशस्वी करीयर निर्माण करा, असे आवाहन राजे रामराव महाविद्याल्याचे माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले यांनी केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या मान्यतेने विवेकानंद इन्स्टिट्यूट जत येथे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण या माेफत डिप्लोमा कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक ज्योतीराम बोबडे व इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सौ. उज्वला बोबडे उपस्थित होत्या.
        अधिक बोलताना माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले म्हणाले, 'महाराष्ट्रातील बेकारी कमी करायची असेल तर कौशल्यावर आधारित शिक्षण प्रणाली सर्वत्र सुरू झाली पाहिजे. विवेकानंद संस्थेने अशा कौशल्यावर आधारीत मोफत प्रशिक्षणाची सोय जतसारख्या ग्रामीण भागामध्ये करून विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. याचा जास्तीत जास्त लाभ घेवून स्वतःमध्ये आवश्यक कौशल्याचा विकास करून जीवनात यशस्वी झाले पाहजे व त्यासोबत सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. 
         या कोर्सच्या शुभारंभप्रसंगी निवृत्त सुभेदार श्री एस. ए. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे करियर घडविण्यासाठी व कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची ग्वाही दिली. यावेळी राजे रामराव महाविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक तुकाराम सन्नके यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करियासाठी आवश्यक प्रभावी संभाषण कौशल्यासाठी इंग्रजी भाषेसोबत सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल, इंग्लिश लँग्वेज याबाबत मार्गदर्शन करून करियरसाठी असलेले त्याचे महत्व विषद केले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे संस्थापक श्री. जे. एस. बोबडे यांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सारथी उपक्रम, प्रशिक्षणाचा हेतू, डिप्लोमा अभ्यासक्रमाचे व प्रशिक्षणाचे स्वरुप याविषयी सविस्तर माहिती देवून हा अभ्यासक्रम सर्वांनी उत्तम प्रकारे पूर्ण करण्याविषयी माहिती दिली. 
          या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेच्या प्राचार्या सौ. उज्वला बोबडे यांनी केले. सुत्रसंचालन शिक्षिका माधुरी वाघमारे व आभार ज्योती हत्ती यांनी मानले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन संस्थेच्या शाखाप्रमुख माळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वैभव सर व टीमने केले. यावेळी प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.


#जनसागर
#जत
#प्रा. तुकाराम उमेश सन्नके 

Comments

Popular posts from this blog

राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू

राजे रामराव महाविद्यालयात पारंपारिक दिन संपन्न

कविता ही मनाची प्रेरणा असते: डॉ. श्रीपाद जोशी