पृथ्वीचे सुरक्षा कवच असणाऱ्या ओझोन थराचे संरक्षण करणे गरजेचे: नहीदा शेख
राजे रामराव महाविद्यालयात जागतिक ओझोन थर संरक्षण दिनानिमित्त एकदिवशीय वेबिनार संपन्न जत (प्रा. तुकाराम उमेश सन्नके) : दि. १६. ओझोन थर सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करून वातावरणात संतुलन राखतो. परंतु मानवनिर्मित प्रदूषणामुळे ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी होत आहे. जो पर्यावरणाला विनाशकारी ठरू शकतो. जर सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीतलावर पडली तर मानवाशिवाय झाडे, प्राणी व इतर जीवजंतू यांच्यावर अत्यंत धोकादायक आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत पृथ्वीचे सुरक्षा कवच असणाऱ्या ओझोन थराचे जतन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालघर येथील ग्रीनविवो सोल्युशनच्या प्रमुख नाहिदा शेख यांनी व्यक्त केले. त्या ग्रीनविवो सोल्युशन्स, पालघर, महाविद्यालयाचा भूगोल विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय 'जागतिक हवामान बदलाविषयी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन' या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये प्रमुख साधन व्यक्ती म्हणून बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील अध्यक्षस्थानी उपस्थित होते. ...