Posts

Showing posts from October, 2023

यशस्वी करीयरसाठी विविध कौशल्ये आत्मसात करा: माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले

Image
सारथी मोफत डिप्लोमा कोर्स प्रथम बॅचचा विवेकानंद इन्स्टिट्यूट जत येथे शुभारंभ जत (प्रतिनिधी) दि. ४. कौशल्यावर आधारीत शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी होवुन विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सुरु असलेल्या मोफत डिप्लोमा प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध कौशल्ये आत्मसात करून यशस्वी करीयर निर्माण करा, असे आवाहन राजे रामराव महाविद्याल्याचे माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले यांनी केले. छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी ) व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या मान्यतेने विवेकानंद इन्स्टिट्यूट जत येथे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी संभाजी महाराज युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण या माेफत डिप्लोमा कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संस्थापक ज्योतीराम बोबडे व इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या सौ. उज्वला बोबडे उपस्थित होत्या.         अधिक बोलताना माजी प्राचार्य डॉ. शिवाजीराव बिसले म्हणाले, 'महाराष्ट्रातील बेकारी कमी करायची असेल तर कौशल्यावर आध...

राजे रामराव महाविद्यालयाचे गांधी जयंतीनिमित्त एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान

Image
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व प्राध्यापक यामधे सहभागी जत: दि.२. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आज जत शहरातील सुनेत्रा कॉलनी व जिल्हा परिषद मराठी शाळा, इंदिरानगर, जत या ठिकाणी दि. १५ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झालेल्या स्वच्छता पंधरवड्याचा भाग म्हणून व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सकाळी दहा ते अकरा या एक तासाच्या कालावधीत स्वच्छता ही सेवा मोहीम अंतर्गत 'एक तारीख एक तास' (एक तास स्वच्छतेसाठी) हे अभियान राबवण्यात आले. या अंतर्गत जत येथील सुनेत्रा कॉलनी परिसर व जिल्हा परिषद मराठी शाळा, इंदिरानगर या ठिकाणच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यामध्ये रस्त्यांची व परिसराची साफसफाई, खुरटी झाडे व गवत काढणे, काडीकचरा वेचणे, कागद व प्लास्टिक गोळा करणे याचा समावेश होता.        एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमाचे मार्गदर्शन व नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पुंडलिक चौधरी व प्रा. तुकाराम सन्नके यांनी केले. प्रारंभी उपस्थित प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा...