Posts

Showing posts from March, 2024

सत्याचा शोध हाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा पाया: डॉ. राजेंद्र लवटे

Image
राजे रामराव महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा जत प्रतिनिधी: दि.१. सत्याचा शोध हाच वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पाया असून 'माणूस' म्हणून परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तो फार महत्वाचा आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेंद्र लवटे यांनी व्यक्त केले. ते राजे रामराव महाविद्यालय, जत येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित 'वैज्ञानिक दृष्टीकोन: काळाची गरज" या विषयावर व्याख्यान देताना प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सुरेश पाटील उपस्थित होते.   डॉ. लवटे पुढे म्हणाले, प्रत्येक भारतीय नागरिकाने 'वैज्ञानिक दृष्टिकोनाचा' प्रचार, प्रसार व अंगीकार केला पाहिजे. कुठल्याही घटितामागचा कार्यकारणभाव समजून घेणे. दोन घटनांमधील परस्परसंबंध तपासण्यासाठी व एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच "निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग" या मार्गांनी ज्ञान आत्मसात करण्याची वैज्ञानिक पद्धत आत्मसात केली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्दप्रामाण्य म्हणज...