Posts

Showing posts from December, 2023

अचकनहळळीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर

Image
राजे रामराव महाविद्यालयाचे १५० स्वयंसेवक व प्राध्यापक होणार सहभागी जत/प्रतिनिधी: दि. २७. येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराचे "स्वच्छ भारत अभियान" हे ब्रीद घेऊन मौजे अचकनहळळी, ता. जत येथे गुरूवार दि.२८ डिसेंबर २०२३ ते बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.          अधिक बोलताना ते म्हणाले, गुरूवार दि.२८ डिसेंबर २०२३ रोजी स. १० वा. शिबीराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या शुभहस्ते होणार असून यावेळी जतचे पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अचकनहळळी गावच्या सरपंच सौ. सुनंदा कोळी, उपसरपंच सौ. महादेवी कोळी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत. सदर निवासी शिबिरात स्वयंसेवक ग्रामस्वच्छता, रस्ते दुरुस्ती, वृक्षलागवड, गावाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण व पशुधन आरोग्य तप...