राजे रामराव महाविद्यालय जत येथे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश सुरू
अकरावी, पदवीत्तर ते पीएचडी शिक्षणाची सोय; जत तालुक्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालय अशी ओळख जत प्रतिनिधी: दि. १२. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे राजे रामराव महाविद्यालय या जत तालुक्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी प्रवेश सुरू झाले आहेत. यामध्ये कनिष्ठ विभाग कला, वाणिज्य व विज्ञान शाखा, वरिष्ठ विभाग कला, वाणिज्य, विज्ञान व बीसीए यांचा समावेश आहे. याचबरोबर रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सुद्धा प्रवेश सुरू झाले असून जत तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज योग्य कागदपत्रासह महाविद्यालयामध्ये सादर करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे. अधिक माहिती सांगताना ते म्हणाले, अवर्षणग्रस्त अशा जत तालुक्यात ज्ञानाची गंगोत्री वाहत राहावी व प्रत्येक घरात ज्ञानाच्या सूर्याचा लख्ख प्रकाश पडावा या उदात्त हेतूने तसेच ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ध्येय उराशी बाळगून शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे व जत संस्थानचे भूतपूर्व नरेश श्रीमंत वि...